Thursday, August 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.पावसाची अनिश्चितता आणि शेतीमालाला मिळणारे कवडीमोल दर यातच आता खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे. विशेषतः खरीप हंगाम तोंडावर असतांना उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.कृषी केंद्र चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,यंदा कीटकनाशकांच्या किंमतीत १५ ते २० टक्के,तर बियाण्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.खताच्या गोणीमागे झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.कापूस,तूर आणि सोयाबीनच्या पेरणीपूर्वीच हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागत असल्याने,आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर भांडवल उभारण्याचे मोठे संकट आहे. त्यातच,अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पेरणी करावी की थांबवावी? या विवंचनेत शेतकरी आहेत.खतांच्या किंमतीत झालेली वाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. उत्पादन खर्च वाढला असून शेतमालाचे भाव कमी आहेत.शासनाने खतांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी,अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!