Monday, August 17, 2026
Homeचंद्रपूरबटन दाबली दुसरीच अन् लाईट लागला 'कमळ' बटनीचा.. - 'ही कायची भानगड'...

बटन दाबली दुसरीच अन् लाईट लागला ‘कमळ’ बटनीचा.. – ‘ही कायची भानगड’ म्हणत फोडली ईव्हीएम मशीन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यात आज,मंगळवार २ डिसेंबरला  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली.आज सर्वत्र मतदारांमध्ये उत्साह पहावयास मिळाला,तर काही ठिकाणी मतदारांचा रोषही पहावयास मिळाला.अश्याच प्रकारचा रोष चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत उघडकीस आला आहे.गडचांदूर नगरपरिषद निवडणुकी दरम्यान प्रभाग क्रमांक-९ मधील आदर्श हिंदी विद्यालय येथील केंद्र क्रमांक-२ मध्ये ईव्हीएम मशीनवरून मोठी धांदल उडाली.एका मतदाराने बटन दाबली दुसरीच अन् लाईट लागला ‘कमळ’ बटनीचा, यात मतदाराने ‘ही कायची भानगड’ म्हणत चक्क ईव्हीएम मशीनच फोडून टाकली.राम मल्लेश दुर्गे वय ४० वर्षे असे ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या मतदाराचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
राम दुर्गे हे आदर्श हिंदी विद्यालय येथील केंद्र क्रमांक-२ मध्ये मतदान करण्यासाठी गेले होते.मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान करतांना ईव्हीएम मशीनवरील ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबताच अचानक बाजूला असलेल्या भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा लाईट लागला.यामुळे गोंधळलेल्या राम दुर्गे यांनी रागाच्या भरात ईव्हीएम मशीन उचलली आणि खाली धाडकन जमिनीवर आदळली.अचानक घडलेल्या प्रकारामुळे केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.मतदाराचा आरोप आणि मशीन फोडल्याची घटना समजताच केंद्राबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली.संतप्त नागरिकांनी “भाजप मुर्दाबाद”च्या घोषणा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला.परिणामी काही काळ मतदान प्रक्रिया थांबली आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, गडचांदूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती हाताळली आणि मतदान पूर्ववत सुरू करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!