Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तफुगा फुगवतांना तोंडातच फुटला; आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू...

फुगा फुगवतांना तोंडातच फुटला; आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लहान मुलांसोबत खेळत असतांना चिमुकलीला फुगा मिळाला.त्यातच फुगा फुगवत असतांनाच अचानकपणे फुगा तोंडातच फुटल्याने एका आठ वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमावावा लागल्याची घटना आज,गुरुवार २७ मार्चला धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात घडली. डिंपल मनोहर वानखेडे वय ८ वर्षे असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
डिंपल ही नेहमी प्रमाणे इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत होती.यावेळी तिला घराजवळ पडलेला फुगा मिळाला.डिम्पलने फुगा घेतला आणि फुगवला. मात्र, फुगा फुगवतांना तोंडातच फुगा फुटला.अशातच चिमुकलीच्या घशात फुग्याचे तुकडे अडकले आणि तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला.त्यामुळे चिमुकली रडायला लागली.तितक्यातच मुलांनी पळत जाऊन तिची आई मनीषा यांना सदरचा प्रकार सांगितला.त्यांनी तात्काळ आपल्या खाजगी वाहनाने तिला रुग्णालयात नेले.मात्र,तोपर्यंत उशीर झालेला होता.रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी चिमुकलीला तपासणी असंती मृत घोषित केल्याने आईने रुग्णालयात एकच हंबरडा फोडला.घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!