उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात देंवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.काल ८ मार्च रोजी साजरा झालेल्या महिला दिनानंतर महिलांसाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्यात आले.राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ अभियान सुरू करण्यात आले आहे.पिवळया व केशरी क्षिधापत्रीका असणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार,चौथीत ४ हजार,सहावीत ६ हजार तर अकरावीत ८ हजार रूपये देण्यात येणार आहेत. लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.लेक लाडकी अभियान सुरू करण्यात आले आहे.महिलांना राज्य परिवहन मंडणाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट ५९ टक्के सूट देण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात ८१ हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत.आशा सेविकांसाठी ३५०० तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन ४ हजार रुपये आहे.त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरून १० हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरून ७२०० रुपये एवढे करण्यात आले आहे.अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरून ५५२५ रुपये करण्यात आले आहे.
अडचणीतील महिलांसाठी,लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी,कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे.या योजनेत पीडित महिलांना आश्रय,विधी सेवा,आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येणार आहे.