Friday, October 16, 2026
Homeमुंबईशेतऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिएम किसान सन्मान निधी प्रमाणेच राज्य सरकारही देणार ६ हजार...

शेतऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिएम किसान सन्मान निधी प्रमाणेच राज्य सरकारही देणार ६ हजार रुपये- शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार १२ हजार रुपये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे.केंद्र सरकारचे ६ हजार रुपये आणि राज्याचे ६ हजार रुपये,याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करीत आहेत.यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.देवेंद्र फडणवीस म्हणाले,आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल.शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे.त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल.पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी ६ हजार रुपये,अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण १२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले,राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना महासन्मान निधीचा फायदा होईल. यासाठी राज्य सरकार दरवर्षी ६२०० कोटी खर्च करेल.याशिवाय पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याची दोन टक्के रक्कम भरावी लागत होती.मात्र, आता ती रक्कमही शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही.अर्जासाठी केवळ एक रुपया खर्च करुन शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल.त्यांचा विम्याचा पूर्ण हिस्सा सरकार भरेल. यासाठी राज्य सरकारवर ३३१२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार असल्याचेही म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!