Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोली२० मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन...- प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला महिला...

२० मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन…- प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला महिला लोकशाही दिनाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा; यादृष्टीने महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणेकरीता सुचित केले आहे.त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. 

 २० मार्च २०२३ रोजी सोमवार सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे,सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज विहीत नमुण्यात दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येणार आहेत. 

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली बॅरेक क्र.१खोली क्र.२६ व २७ जिल्हाधिकारी कॉम्प्लेक्स ता.जि. गडचिरोली या कार्यालयात निशुल्क उपलब्ध असणार असल्याची नोंद घ्यावी;असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!