Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीप्रत्येक विभागाने जबाबदारीने नियोजन करून कृती आराखडे तयार करावेत-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

प्रत्येक विभागाने जबाबदारीने नियोजन करून कृती आराखडे तयार करावेत-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक निधी मिळविण्यासाठी गुणवत्तापूर्ण व परिणामकारक वार्षिक कृती आराखडे तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या.१५ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करून त्यानुसारच जिल्हा विकास निधीअंतर्गत कामांचे प्रस्ताव सादर करावेत,असे त्यांनी यावेळी  सांगितले.
जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की,महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत जिल्ह्यांना कामगिरीआधारित प्रोत्साहनात्मक निधी दिला जाणार असून,यासाठी वार्षिक कृती आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.शासन निर्णयानुसार अंमजबजावणीमध्ये किमान ६० टक्के गुण प्राप्त करणारे जिल्हेच निधीस पात्र ठरणार असून, कामगिरीनुसार ८ कोटी ते १६ कोटी रुपयांपर्यंत निधी मिळू शकतो.त्यामुळे सर्व विभागांनी नियोजन करतांना गुणवत्ता,वेळबद्धता आणि परिणामकारकता यावर विशेष भर द्यावा,असे त्यांनी निर्देशित केले. “जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने नियोजन करून कृती आराखडे तयार करावेत.प्रस्तावित कामे ही मोजता येण्याजोगी, ठोस आणि ठराविक कालावधीत पूर्ण होणारी असावीत,” असेही जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी नमूद केले.
शासन निर्णयानुसार कृती आराखड्यांमध्ये समाविष्ट कामांची पूर्णता,खासगी गुंतवणूक वाढ,जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा प्रभावी वापर तसेच अपेक्षित परिणाम या प्रमुख निकषांवर जिल्ह्यांची कामगिरी मोजली जाणार आहे.या निकषांवर आधारित गुणांकनानुसारच प्रोत्साहनात्मक निधी वितरित केला जाणार आहे.तसेच,प्रस्तावित कामे ही आर्थिक वाढ, शाश्वत विकास,पर्यावरणपूरक उपक्रम,इको-टुरिझम, कचरा व्यवस्थापन,वन्यजीव संवर्धन यांसारख्या क्षेत्रांशी सुसंगत असावीत. ‘मिशन लाईफ’ संकल्पनेशी निगडीत प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
निधीच्या वापरासाठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिली असून,मोठ्या स्वरूपाची बांधकामे,पर्यावरणास अपायकारक प्रकल्प किंवा भूसंपादनाशी संबंधित कामांवर हा निधी वापरता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.महास्ट्राईड अंतर्गत निधी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारी समिती कार्यरत राहणार असून,विविध विभागांमधील समन्वयातून कामे मंजूर व राबविण्यात येणार आहेत.बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!