- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असतांनाच आज,सोमवार २० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल ९ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यातील विशेष महत्वाची बाब म्हणजे,तब्बल साडेतीन वर्षे गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे निलोत्पल यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.तर गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांना गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती देण्यात आली आहे.त्याचबरोबर,योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक(अतिरिक्त जबाबदारी)म्हणून नेमण्यात आले आहे.
- आयपीएस अधिकाऱ्यांची बदली व नियुक्तीचे ठिकाण👇
१.तुषार दोशी- पोलीस अधीक्षक,सातारा यांची बदली पोलीस अधीक्षक,सांगली येथे करण्यात आली.
२.निखिल पिंगळे- पोलीस उप आयुक्त,पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक,सातारा या ठिकाणी करण्यात आली.
३.संदीप घुगे- पोलीस अधीक्षक,सांगली यांची बदली
पोलीस आयुक्त,सुरक्षा,राज्य गुप्तवार्ता विभाग,पुणे येथे करण्यात आली.
४.योगेश गुप्ता- पोलीस अधीक्षक,कोल्हापूर यांची बदली पोलीस उप महानिरीक्षक,गडचिरोली परिक्षेत्र (अतिरिक्त पदभार)येथे करण्यात आली.
५.निलोत्पल- पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांची बदली पोलीस अधीक्षक,कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आली.
६.एम.रमेश- अप्पर पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांना गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती.
७.महेश्वर रेड्डी- पोलीस अधीक्षक,जळगाव यांची बदली पोलीस अधीक्षक,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे या ठिकाणी नियुक्ती.
८.श्रीकांत धिवरे- पोलीस अधीक्षक,धुळे यांची बदली पोलीस अधीक्षक,जळगाव या ठिकाणी नियुक्ती.
९.राजकुमार शिंदे- पोलीस उप आयुक्त,पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक,वाशीम या ठिकाणी नियुक्ती.
- Advertisement -

