Saturday, September 5, 2026
Homeब्रम्हपुरीप्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री; ब्रम्हपुरी पोलिसांची कारवाई..

प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री; ब्रम्हपुरी पोलिसांची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-प्रतिबंधीत नायलॉन मांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका दुकानदाराच्या आज,शनिवार १० जानेवारी रोजी ब्रम्हपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.प्रकरणी ब्रम्हपुरीच्या बालाजी वार्ड येथील दिलीप रामचंद्र गजपुरे याच्यावर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ५ व १५ अन्वये गुन्हा दाखल करून दुकानातून ३५ हजार रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आज शनिवारी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांचा शोध घेत असतांनाच पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की,ब्रम्हपुरीच्या बालाजी वार्ड येथील दिलीप रामचंद्र गजपुरे हा आपल्या ‘ओमकार डेली निड्स’ दुकानात प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करतो आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा कारवाई करत संबंधित दुकानाची झडती घेतली.झडतीदरम्यान,पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा,मानवी जीवितास तसेच पर्यावरणास गंभीर धोका निर्माण करणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजा मोनो केटीसी व मोनो फाईटर  प्रकारातील एकूण ३० प्लास्टिक चक्री बंडल,अंदाजे किंमत ३५ हजार रुपये,अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला.प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व प्रभारी एसडीपीओ दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात पार पडून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे,पोलीस हवालदार मुकेश गजबे,पोलीस अंमलदार निलेश तुमसरे,इरशाद खान,स्वप्नील पळसपगार,वशिष्ठ रंगारी व प्रविण भिवगडे यांच्या पथकाने कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!