Wednesday, May 6, 2026
Homeचंद्रपूरपोहण्यासाठी गेलेले दोन मुले नदीत बुडाले; तर दोघेजण बचावले..!

पोहण्यासाठी गेलेले दोन मुले नदीत बुडाले; तर दोघेजण बचावले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातील चौघे मित्र शहरापासून काही अंतरावर असलेल्या नदी तीरावर पोहण्यासाठी नदीत उतरले असता दोघांना वाचविण्यात यश आले.तर दोघेजण नदीत बुडाले असल्याची घटना आज,रविवार २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास वर्धा नदीच्या तुराणा घाटावर घडली.१५ वर्षीय प्रणय विनोद भोयर रा.जिजामाता वॉर्ड वरोरा व १३ वर्षीय रुपेश विजेंद्र कुळसंघे रा.कर्मवीर वॉर्ड वरोरा,जि.चंद्रपूर अशी नदीत बुडालेल्या मुलांची नावे असून दोघांचाही अद्याप शोध लागलेला नाही.उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोघांना जवळच असलेल्या एका गुराख्याने धाव घेत दोघांचे प्राण वाचविले.
आज रविवार शाळेला सुट्टी असल्याने वरोरा शहरातील चौघे मित्र दुपारच्या सुमारास शहरापासून काही अंतरावर असलेल्या वर्धा नदीच्या तुराणा घाटावर सायकलने गेले होते.सायकल आणि कपडे बाजूला ठेवत पोहण्यासाठी चौघेही नदीपात्रात उरतले.तितक्यातच नदी घाटाच्या दिशेने एक महिला येतांना दिसताच चारही मित्रांनी नदी पात्रातील पाण्यात छुपण्याचा प्रयत्न केला.अश्यातच पाण्याची पातळी वाढलेली असल्याने चौघेही खोल पाण्यात गेले.बुडत असल्याचे लक्षात येताच चौघांनीही वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड केली.प्रसंगी नदी तीरावर गुरे राखणाऱ्या गुराख्याला ओरडण्याचा आवाज ऐकू येताच तो धावून गेला आणि चौघांपैकी दोघांना वाचविण्यात यश आले.यात उमंग आणि कृष्णा यांना बाहेर काढले,तर प्रणय व रुपेश दोघेही खोल पाण्यात बुडाले.घटनेची माहिती गुराख्याने पोलिसांना देताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले.बुडालेल्या मुलांचा शोध घेणे सुरू होते.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत उद्याला शोधमोहीम राबवली जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकार आणि इस्त्राईल सरकार यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार,भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने...

क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली असून क्षुल्लकशा कारणासाठी बापाने पोटच्या नऊ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बाब आज...

मंत्रिमंडळ निर्णय; अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ,नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार ५ मे रोजी मंत्रीमंडळ बैठक पार पडली.या बैठकीत आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण...

आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ३.१५ लाखांचे अर्थसाहाय्य वस्तू स्वरूपात न देता थेट बचत गटांच्या बँक खात्यात होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवण्याच्या योजनेत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!