Friday, September 11, 2026
Homeगोंदियापोलिस गणवेश परिधान करण्याचे स्वप्न राहिले अधुरे..

पोलिस गणवेश परिधान करण्याचे स्वप्न राहिले अधुरे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-पोलीस भरतीची तयारी करणारे दोघेजण आंघोळीसाठी नदीत उतरले असता खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल,रविवारी २५ मे च्या सकाळी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला, मानेकसा बाघनदी परिसरात उघडकीस आली. कृष्णकुमार हेतराम पारधी वय १९ वर्षे व शुभम भीमराव कांबळे वय २० वर्षे अशी मृतांची नावे असून दोघेही आमगाव तालुक्यातील कालीमाटी गावातील रहिवासी होते.माहितीनुसार,पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण सकाळच्या सुमारास धावण्यासाठी(रणींग) गेले होते. यात कृष्णकुमार,शुभम व त्यांचा मित्र रवी टेंभरे हे तिघेही धावून झाल्यानंतर काहीकाळ विश्रांती घेत बसले होते.त्यानंतर कृष्णकुमार व शुभम हे दोघे बाघ नदीतील मानेडोह परिसरात आंघोळ करण्यासाठी  नदीत उतरले.पाण्यात उतरताच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडू लागले.अशातच जवळच असलेला मित्र रवी टेंभरे घाबरला व त्याने घटनेची माहिती गावकऱ्यांना मोबाईलद्वारे दिली.त्यानंतर गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मच्छिमार आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.दोघेही पोलीस भरतीची तयारी करीत होते.त्यांनी लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र,पोलिस गणवेश परिधान करण्याच्या पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!