Sunday, September 6, 2026
Homeगोंदियापोलिसाकडूनच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शोषण-प्रकरणाचा योग्यरीत्या तपास न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर...

पोलिसाकडूनच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शोषण-प्रकरणाचा योग्यरीत्या तपास न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईचे आदेश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- घर काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीचे वय १५ वर्षे शोषण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी प्रकरणाचा योग्यरीत्या तपास न करणे व अनेक बाबी हेतुपुरस्सर लपविणे पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी काल,मंगळवारी (दि.१६) दिले.गंगाझरी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी वैशाली गावडे यांचे पती पिंकू राधेश्याम झाडे हे गडचिरोली पोलिस दलात कार्यरत आहेत.या दाम्पत्याने पोरक्या झालेल्या १५ वर्षीय मुलीला घरची कामे व त्यांच्या ३ वर्षीय मुलीचे संगोपन करण्यासाठी कामावर ठेवले होते.लहान मुलीचे संगोपन करताना ती चुकली की तिला मारहाण व छळ करायचे.एवढेच नव्हे तर पिंकू झाडे याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

तिला जुलै २०२२ पासून अधामधात मारहाण करणे सुरू होते.गंगाझरी पोलिस ठाण्यात वैशाली गावडे हिची बदली झाल्याने ती गंगाझरी येथे तर तिचा पती पिंकू झाडे कोरची (जि.गडचिरोली) येथे आहे. आठवड्यातून एक-दोन वेळा तो गंगाझरीला येत असून शेजाऱ्यांच्या घरातून मिरची आणल्याच्या कारणावरून दोन-तीन महिन्यांपूर्वी वैशालीने तिच्या डोळ्यावर मारहाण केल्याने तिला गंभीर दुखापत झाली होती.मुलीला नीट बघता येत नव्हते व अशात त्यांच्या दोन वर्षीय मुलीचे बोट दारात दाबल्या गेल्याने वैशालीने तिच्या गालावर जोडे मारले होते. मुलीला गरम दूध दिल्यावरूनही तिच्या पाठीवर, हाताला आणि पायावर रोलिंग पिनने इजा केल्या होत्या.यात ती मुलगी बेशुद्ध झाली होती.ही घटना घरमालकाला सांगितल्याने तिला बेल्टने मारहाण करण्यात आली.

या मारहाणीची चित्रफीत घरमालकाच्या मुलीने तयार करून ती समाजमाध्यमांवर व्हायरल केली.त्यामुळे त्या पीडित मुलीला आरोपींनी १६ मार्च २०२४ रोजी गडचिरोली येथे सोडले त्यानंतर गंगाझरी पोलिसात याप्रकरणी भादंवि कलम ३२४, ३५४, ३२३ सहकलम ८,१२ बालसंगोपन आणि संरक्षण कायदा कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लेवार यांनी केला.परंतु उल्लेवार याने पिंकू झाडेला वाचविण्यासाठी अयोग्य कलम लावले व व्हिडीओ रेकॉर्डिंग न्यायालयासमोर लपवून ठेवल्याची बाबही  उघड झाली आहे.

त्या मुलीची नेत्ररोगतज्ज्ञांद्वारे वैद्यकीय तपासणी केल्यावर उजव्या पॅरिएटल भागात ३ सेंमी डाग असल्याचे दिसून आले.नेब्युलर कॉर्नियल अपारदर्शकता-देखील आढळली.आरोपीच्या मुठीच्या मारामुळे ती अशी झाली आहे.केस डायरीत व्हिडीओ रेकॉर्डिंगचा संदर्भ असला तरी,तो रेकॉर्डवर नाही.हा व्हिडीओ ५:२६ मिनिटांचा आहे.व्हिडीओ पाहिल्यास धक्कादायक खुलासे होतात.त्या व्हिडीओत मुलीने आपल्यावर वारंवार अतिप्रसंग झाल्याचा खुलासा करूनही याचा उल्लेख पोलिस उपनिरीक्षक उल्लेवार याने रेकॉर्डवर केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जामिनावर सुटल्यास साक्षीदारांना धमकावणार

पिंकू झाडे याने १५ वर्षीय मुलीला बूट,रोलर पिन आणि बेल्टने मारहाण केली.अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविणे बाकी असताना त्याला जामिनावर सुटका दिल्यास तो साक्षीदारांना धमकावू शकतो.पीडितेचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारी वकिलांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.

पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करा

पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लेवार यांना कारणे दाखवा नोटीस जारी करा; तसेच अपूर्ण कलम लावल्यामुळे योग्य कारवाई करण्याचे आदेश देत त्याचे स्पष्टीकरणही घ्यावे.शिवाय,या प्रकरणातील आरोपी पिंकू झाडे याच्यावर कलम ३७६ (२) (फ), ३७६ (३), कलम ४ (२), ५ (१) कलम वाढविण्यात यावेत.तसेच त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!