- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील २८ वर्षीय तरुणाची मोबाईलच्या क्षुल्लक कारणावरून तिघा मित्रांनी मिळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी,९ ऑगस्ट २०२४ रोजी उघडकीस आली होती.सदरची घटना ताजी असतांनाच परत काल,शनिवारी २४ ऑगस्टला सकाळी कुरखेडा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने कुरखेडा शहरात एकच खळबळ उडाली.ज्योती ऊर्फ चांदनी मसाजी मेश्राम वय २६ वर्षे असे मृत तरुणीचे नाव आहे.
काल,शनिवारी सकाळच्या सुमारास काही युवक स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेले असता त्यांना शाळेच्या भिंतीलगत तरुणीचा मृतदेह आढळून आला.सदर वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, ठाणेदार महेंद्र वाघ यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले.पंचनाम्यानंतर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. युवतीच्या शरीरावर जखमेच्या कुठल्याही खुणा आढळल्या नव्हत्या.रुग्णालयात शवविच्छेदन केल्याने तरुणीचा मृत्यू गळा दाबून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान,पोलिसांनी तातडीने तपासचक्रे गतीमान केले व याप्रकरणी कुरखेडा शहरतीलच इकराम सलाम शेख वय ३६ वर्षे याला पोलिसांनी जेरबंद केले.
जुन्या पैशाच्या वादातून इकराम सलाम शेख याने तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
- Advertisement -