- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-देसाईगंज (वडसा)वन विभागाअंतर्गत येणाऱ्या कुरखेडा तालुक्याच्या पुराडा वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या उपक्षेत्र कोहका येथील वनरक्षक नरेंद्र सिताराम तोकलवार यास २० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून सदरची कारवाई काल,शुक्रवार २४ जानेवारीला करण्यात आल्याने जिल्ह्याच्या वन विभागात एकच खळबळ माजली.
याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार हा घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून स्वतःच्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक करीत होता.त्यामुळे वनरक्षरक नरेंद्र तोकलवार यांनी अडवणूक करून रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली.त्यानुसार तक्रारदार यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार २३ जानेवारीला गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्याने प्रकरणाची पडताळणी करण्यात आली.तडजोडीअंती २० हजार रुपये घेण्याची इच्छा वनरक्षक तोकलवार यांनी दर्शविली.त्यानुसार एसीबीने सापळा रचून काल,शुक्रवारी लाचखोर वनरक्षकास अटक केली.
सदरची कारवाई नागपूर तसेच गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली.
- Advertisement -