Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीपुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचे सापडले मृतदेह..

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचे सापडले मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले दोघेजण कोरचीला परत जात असतांना बेळगाव-पुराडा नाल्यावर दुचाकीसह पुराच्या पाण्यात बुधवार २३ जुलै रोजी वाहून गेले होते.पुराच्या पाण्यात वाहून जात असतांना काही नागरिकांनी प्रत्यक्ष बघितले होते.त्यानुसार याबाबत बेळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.बेळगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी शोधमोहीम राबवली असता दुचाकी आढळून आली. मात्र,दोघे आढळून आले नसल्याने परत शोधमोहीम राबविण्यात आली.अखेर आज,शनिवार २६ जुलै रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचेही मृतदेह सापडले.तलवारशहा मडावी वय ४५ वर्षे व देवसाय मडावी वय ६० वर्षे अशी पुराच्या पाण्यात वाहून मृत पावलेल्या मृतकांची नावे असून दोघेही कोरची तालुक्याच्या सोनपूर येथील रहिवासी होते.पुढील तपास बेळगाव पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!