Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपाऊस गेला लांबणीवर; उकाड्याने केले हैराण..!

पाऊस गेला लांबणीवर; उकाड्याने केले हैराण..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील जुलै महिन्यात थांबा देत बरसलेल्या मुसळधार पावसाने सर्वांना आनंदित करून सोडले होते.अश्यातच आता पावसाने दडी मारल्याने सर्वांनाच घामाघूम करून सोडले आहे. पाऊस बरसत नसल्याने उकाडा वाढला आहे.वाढलेल्या उकाड्यामुळे शेतातील बांध्यांतील पाणी सुकल्यामुळे रोवणीची कामेदेखील प्रभावित झाली आहेत.जुलै महिन्यात अधूनमधून बरसणाऱ्या संततधार पावसामुळे गारवा वाढून पारा घसरू लागला होता.त्यामुळे थंडावा जाणवत होता.मात्र,गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे.अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असून, दमदार पाऊस नसल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.मात्र,पावसाने दडी मारताच उकाडा वाढला आहे.अचानक वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहेत.विशेष म्हणजे, लहान मुले व वृद्धांना याचा अधिकच त्रास होत आहे.अनेक जिल्ह्यांत अल्प पावसामुळे पिके कोमेजण्याच्या मार्गावर असतांनाच आगामी दोन आठवडे पाऊस उसंत घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांवर संकट ओढावले आहे.आत दमदार पाऊस बरसला नाही,तर खरीप हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झालेला दिसून येतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!