उद्रेक न्युज वृत्त
येत्या २१ ते २५ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.मात्र त्याआधी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देऊ नये;असे आदेश केंद्राना दिले आहे.पूर्वी १० मिनिटे उशिर झाल्यानंरही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.मात्र आता उशिरा गेल्यास वर्ष वाया जाऊ शकतो; यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत परीक्षेस जावे.