Monday, May 18, 2026
Homeनागपूरपत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

पत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-संसाराचा गाडा हाकतांना पतीसोबत तिचे वारंवार खटके उडायचे.संसारातील कलह इतका वाढला की,सततच्या भांडणांमुळे पत्नी मनातून खचली.पती-पत्नीचे पटत नसल्याने महिनाभरापूर्वीच ती आपल्या माहेरी परतली होती.माहेरी आल्यानंतरही तिच्या मनातील अस्वस्थता कायम होती.एकांतवासात तिने पुन्हा एकदा आपला संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पतीला वारंवार फोन लावले,मनातील संवाद साधू इच्छिणाऱ्या मैत्रिणींनाही संपर्क केला.मात्र,पतीने एकही कॉल उचलला नाही.कोणाशीही संवाद न झाल्याने आणि पतीने प्रतिसाद न दिल्याने उदासीन झालेल्या पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला.तत्पूर्वी तिने एक हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली,ज्यात तिने ‘आय लव्ह यू संदीप’ म्हणत आपल्या प्रेमाची साक्ष दिली आणि पतीच्या वागण्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट करून राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.मयुरी संदीप मेंढे वय ३४ वर्षे,(माहेरचे नाव मयुरी राष्ट्रपाल मानवटकर, रा.महादुला (कोराडी),ता.कामठी,जि.नागपूर असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून मयुरीचा विवाह काही वर्षापूर्वी वर्धा येथील संदीप शालिक मेंढे यांच्याशी झाला होता. दोन दिवसांपूर्वी महादुला येथील बौद्ध विहारात कार्यक्रम असल्याने घरातील सर्व मंडळी तिथे गेली होती. मयुरी घरी एकटीच होती.रात्री घरची मंडळी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता.अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मयुरीच्या आत्महत्येमुळे तिचे माहेरचे कुटुंब हादरले आहे.मयुरीला पतीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता,त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले,असा थेट आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून ती चिठ्ठी जप्त केली असून,मयुरीचा भाऊ सुहास याच्या तक्रारीनंतर कोराडी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!