Saturday, May 2, 2026
Homeनागपूरपतीच्या हत्ये प्रकरणी पत्नीस तीन दिवसांची पोलीस कोठडी.. -पतीच्या छाताडावर लाथ मारल्याचे...

पतीच्या हत्ये प्रकरणी पत्नीस तीन दिवसांची पोलीस कोठडी.. -पतीच्या छाताडावर लाथ मारल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या पतीला दारूचे व्यसन जडले आणि दारू पिण्यासाठी तो पत्नीचे दागिने चोरून विकायला लागला.त्यामुळे चिडलेल्या पत्नीने रागाच्या भरात त्याच्या छाताडावर जोरात लाथ मारली.त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी पत्नीस अटक करून काल शनिवारी काटोल शहरातील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.रोहित ऊर्फ माधव रामराव जाधव वय ३५ वर्षे, रा.हिंगोली असे मृताचे नाव आहे.तो दोन वर्षांपासून रिंगणाबोडी,ता.काटोल येथील हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा.
दारू पिण्यासाठी त्याने आधी पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून विकले होते.त्यातच त्याने गुरुवारी ३० जानेवारीला सोन्याची अंगठी घरून चोरून नेली व विकली.तो दारूच्या नशेत असतांना चिडलेल्या पत्नीने त्याच्या छाताडावर लाथ मारली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.या प्रकरणात कोंढाळी पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या पत्नीला ताब्यात घेत अटक केली.न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.कोंढाळी पोलिस ठाण्यात महिलांचे लॉकअप नसल्याने तिला काटोल ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.रोहितचा मृत्यू त्याच्या छातीच्या बरगड्या तुटल्याने झाल्याचे प्राथमिक पोस्टमार्टेम(पीएम) रिपोर्टमध्ये आढळून आले आहे. त्याला १० वर्षाचा साहिल व सात वर्षाचा श्री अशी दोन मुले आहेत.वडिलांची हत्या व आईला अटक केल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती रोहितच्या आई वडिलांना दिली होती. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्याची आई कोल्हाबाई रामराव जाधव हिच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी साहिल व श्री या दोन्ही मुलांना त्यांच्या आजीच्या सुपूर्द केले.ती मृतदेह व दोन्ही नातवांना घेऊन हिंगोलीला निघून गेली. न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने भांडणाव्यतिरिक्त आणखी काही घडले होते काय? याचा उलगडा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!