उद्रेक न्युज वृत्त :-पतसंस्थेत ठेवलेली रक्कम संस्थेने परत न केल्याने बाळाराम आनंदा शिंदे रा.नागज, जि.सांगली यांनी जिल्हा ग्राहक तक्रार मंचात धाव घेतली.मुदत संपून व मागणी करूनही संस्थेने ठेव परत दिली नाही,अशी तक्रार जिल्हा ग्राहक न्यायालयात केली होती.त्यानुसार सांगली जिल्हा ग्राहक न्यायालयाने संस्थेने ३ लाख १७ हजार रुपयांच्या ठेवी व त्यावरील व्याज,तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल पाच हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून तीन हजार रुपये ४५ दिवसांत शिंदे यांना परत देण्याचे आदेश ३१ ऑगस्ट २०१६ रोजी दिले होते.न्यायालयाने आदेश देऊनही संस्थेने ही रक्कम दिली नाही,म्हणून शिंदे यांनी संचालकांना शिक्षा होण्यासाठी ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता.ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम २७ अन्वये केली होती.ॲड.एस.आर. कुडाळकर व ॲड.दत्तात्रय जाधव यांच्यामार्फत हा खटला त्यांनी दाखल केला होता.या खटल्यामध्ये संचालक दोषी आढळल्याने न्यायालयाने सातजणांना शिक्षा सुनावली.न्यायालयाने आदेश देऊनही ठेवीदाराची रक्कम परत न दिल्याबद्दल नानासाहेब सगरे को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,कवठेमहांकाळ, जि.सांगली या संस्थेच्या सात संचालकांना एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ग्राहक न्यायालयाने सुनावली.संस्थेचे व्यवस्थापक शिवलिंग मुरग्याप्पा आरळी,उपाध्यक्ष सुकुमार बाबा कोठावळे दोघेही रा.कवठेमहांकाळ,संचालक सुहास शिवाजी पाटील रा.आगळगाव,ता.कवठेमहांकाळ,सत्यवान परशुराम कुंभारकर रा.शिंदेवाडी एम,दत्तात्रय कृष्णा माळी रा.कोकळे,शहाजी रामचंद्र एडके रा.म्हैसाळ एम आणि विश्वास भगवान पवार रा.देशिंग अशी शिक्षा झालेल्या संचालकांची नावे आहेत.न्यायाधीश प्रमोद गो गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील मनीषा वनमोरे व अर्पिता फणसळकर यांच्या पीठाने हा आदेश दिला. अध्यक्षांसह चार संचालक मृत झाल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता केली.
पतसंस्थेकडून ठेवीदाराची रक्कम हडपण्याचा प्रयत्न; जिल्हा ग्राहक मंचात धाव.. – पतसंस्थेच्या तब्बल सात संचालकांना एक वर्षाची शिक्षा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

