- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन पदाधिकाऱ्यांनी पदावरून डच्चू देण्यात आला आहे.यातील काहींनी पक्षाविरोधात भूमिका घेतली तर काही जण बंडखोरीच्या तयारीत आहेत.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी,भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख शंकर हिरामण मांडेकर आणि महाड-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे या तिघांची पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून किशनचंद तनवणी यांनी उमेदवारी दिली होती.मात्र,तनवाणी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली.पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदावरुन कार्यमुक्त केले. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारवाई केली असून त्यांच्या जागी आता शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे; असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले.
अंबादास दानवे👇
पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केली.तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची तातडीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून कार्यमुक्त केले.सदरील सर्व घोषणा मातृभूमी प्रतिष्ठाण संपर्क कार्यालयात आयोजित अधिकृत पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी शिवसेना सचिव अशोक पटवर्धन,सह संपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे व महानगरप्रमुख राजु वैद्य उपस्थित होते.
- Advertisement -

