Thursday, July 30, 2026
Homeनवी दिल्लीन्यूजक्लिकचे मुख्य संपादक यांची तात्काळ सुटका करा- सर्वोच्च न्यायालय

न्यूजक्लिकचे मुख्य संपादक यांची तात्काळ सुटका करा- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- न्यूजक्लिक’चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदान्वये अटक अवैध आहे.त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी; असे आदेश आज दिनांक- १५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या न्यूज वेबसाइटशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले.न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली.दिल्ली पोलिसांनी ‘UAPA’ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या न्यूज वेबसाइटशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. ऑगस्ट 2023 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानंतर ही कारवाई करण्यात आली होती.या रिपोर्टमध्ये,न्यूजक्लिक वेबसाइटवर चीनी प्रचार पसरवण्यासाठी अमेरिकन करोडपतीकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणी पोलिसांनी वेबसाइटवर गुन्हा दाखल केला. न्यूजक्लिकने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. दिल्ली पोलिसांनी ‘UAPA’ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली होती.तत्पूर्वी, 2021 मध्ये न्यूज वेबसाइट आणि तिच्या निधी स्रोताची चौकशी सुरू करण्यात आली होती.प्रबीर पुरकायस्थ यांना दिल्ली पोलिसांनी केलेल्या अटक कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी संशयितांच्या कोठडीची प्रत न्यायालयात सादर करण्यात आली नाही. त्यामुळे ही अटकच अवैध आहे. त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी, असा आदेश खंडपीठाने दिला.

प्रबीर पुरकायस्थ यांचे वकील अर्शदीप खुराना यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत की, ही संपूर्ण कारवाई बेकायदेशीर होती. तसेच बेकायदा अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुरकायस्थ यांना झालेली अटक आणि कोठडीची कारवाई बेकायदेशीर मानली आहे. त्यांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सत्र न्यायालयासमोर जामीनपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!