- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-पती-पत्नीचे घरगुती भांडण,त्यातच सासूचा अबोला,त्यामुळे माझ्या मुलीचा सांभाळ कोण करणार? म्हणून आईने स्वतःच्याच मुलीचा नाक-तोंड दाबून खून केला व स्वतःचीही जीवनयात्रा संपवू पाहणाऱ्या महिलेचा प्रयत्न फसल्याने अखेर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.अनिता संजय साळवे वय-२५ वर्षे,रा.वारजे,पुणे असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे.
आरोपी अनिताचा पती ४ फेब्रुवारी २०१६ रोजी कामावर गेला होता.त्यानंतर अनिताचा पतीशी फोनवर वाद झाला होता.रागाचे भरात तिने स्वतःच्या लहान मुलीचा शालीने नाक तोंड दाबून खून केला.त्यानंतर तिने पंख्याला साडी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.वारजे पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.कौटुंबिक वादातून पतीने बोलणे सोडलेले होते,तसेच सासूने दुर्लक्ष केले होते.माझ्यामागे लहान मुलीची जबाबदारी कोण स्वीकारणार,तसेच तिची फरफट होऊ नये,म्हणून मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली होती. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे निष्पाप बालकाने जीव गमावला असून,तिला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. कौटुंबिक वाद आणि नैराश्यातून तिने मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सरकारी वकील दातरंगे यांनी युक्तिवादात सांगितले.त्यानुसार तिला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- Advertisement -