उद्रेक न्युज वृत्त :-नव्या युगाची नवी पिढी,पती दारू पितो तर पत्नीने कां बर दारू पिऊन पतीसारखे वर्तन करू नये,असाच प्रकार पती-पत्नीच्या घटस्फोट प्रकरणात उघडकीस आला आहे.नुकतेच एका पती- पत्नीच्या घटस्फोटासंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून पत्नी दारू पिते म्हणून ती क्रूर कार्य करते,असा त्याचा अर्थ होत नाही.जोपर्यंत पत्नीकडून दारू पिऊन पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही; तोपर्यंत ती क्रुरता ठरत नाही; असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. पतीने पत्नीवर आरोप केले की,मला न सांगता घरून बाहेर जाते.रात्री बेरात्री दारू पिऊन येते व मित्रांसोबत वेळ घालवत असते,पत्नीकडून माझ्यावर क्रूरते सारखा व्यवहार केला जातो आहे.असे कारण देत पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विवेक चौधरी आणि न्या.ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली.त्यामध्ये, क्रूरता आणि परित्याग दोन्ही गोष्टी एकमेकांपासून विभिन्न आहेत.तसेच,न्यायालयात ही बाब कुठेही सिद्ध झाली नाही की,दारु पिणे ही क्रूरता आहे किंवा दारु पिल्याच्या कारणास्तव जन्मलेल्या मुलांमध्ये कुठलेही शारीरिक व्यंग आहे,किंवा प्रकृती स्वास्थ ठीक नाही. याशिवाय पत्नीला आलेले फोन कॉल्स हे पुरुष मित्राचेच आहेत,याचे कुठेही रेकॉर्ड नाही किंवा ज्यामुळे पतीसोबत क्रूरपणाचे वर्तन झाल्याचे सिद्ध होते,असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यानुसार न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.
पत्नी दारू पिते म्हणून क्रूरता ठरत नाही- उच्च न्यायालय
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

