Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील बाराव्या सत्रात प्रीती ईश्वर चहांदे विजयी….

नाट्यश्री कविता स्पर्धेतील बाराव्या सत्रात प्रीती ईश्वर चहांदे विजयी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : –स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.या उपक्रमाचे बारावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात सिंदेवाही येथील नवोदित कवयित्री सौ. प्रीती ईश्वर चहांदे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवयित्री व त्यांच्या  “मन गुंतले तुझ्यात” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

सौ.प्रीती ईश्वर चहांदे या सिंदेवाही (जि. चंद्रपूर) येथील नवोदित कवयित्री असून नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात.ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या बाराव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने सौ. माधुरी अमृतकर, तनुजा भोयर, प्रतिभा सुर्याराव, जयराम घोंगडे, पी. डी. काटकर,  गजानन गेडाम, विलास जेंगठे,रेखा दिक्षित, तुळशीराम उंदीरवाडे, मुर्लीधर खोटेले, गणेश रामदास निकम, प्रशांत गणवीर, लता शेंद्रे, संतोष कपाले,  भारत झाडे,  मनिषा हिडको, प्रेमिला अलोने, पुरुषोत्तम लेनगुरे, वंदना मडावी, पुरुषोत्तम दहिकर, चरणदास वैरागडे,  खुशाल म्हशाखेत्री,मारोती आरेवार, मालती शेमले, प्रभाकर दुर्गे,  सुजाता अवचट, मिलिंद बी.  खोब्रागडे, ज्योत्स्ना बन्सोड,  उपेंद्र रोहनकर, हरिष नैताम,  संदिप आंबोरकर, प्रीती ईश्वर चहांदे, संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!