Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस २६ मार्च ला गडचिरोलीत….खासदार अशोक नेते यांच्या आशा पल्लवीत...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस २६ मार्च ला गडचिरोलीत….खासदार अशोक नेते यांच्या आशा पल्लवीत होणार की काय ?.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/ मुनिश्वर बोरकर 

गडचिरोली :- चिमुर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची जागा कुणाला मिळणार याची उत्सुकता सिगेला पोहचली आहे.सदर जागेवर राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सुरवातीपासुनच दावा ठोकला आहे.तर भाजपाचे दोनदा खासदार राहीलेले खासदार अशोक नेतेही प्रबळ दावेदार आहेत.तसेच नव्याने डॉ.मिलिंद नरोटे,नुकत्याच भाजपात प्रवेश करणाऱ्या डॉ.नितिन कोडवते,आमदार डॉ.देवराव होळी आदि नावाची चर्चा असताना राष्ट्रवादी कांग्रेसचे राजे धर्मराव बाबा आत्राम यांचे पारडे महायुतीत जड होत होते.परंतु वरिष्ठ भाजपा नेते,उमेदवाराची निवड करतांना सर्व शक्यता पडताडूनच पाहिल्या नंतरच भाजपा की राष्ट्रवादी यांचा योग्य विचार करूनच उमेदवारांची निवड करणार असल्याचे कळते.अन्यथा सदर जागा हातुन जायची व ४०० पार म्हणता म्हणता आकडा २०० वर यायचा म्हणुन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढावे; अशी भाजपाकडून गुगली टाकण्यात आली.परंतु राष्ट्रवादीचे सर्वासर्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते नाकारली व चिमुर लोकसभेसाठी उमेदवार राष्ट्रवादीचाच असे ठणकावुन सांगीतल्याचे कळते.म्हणुनच महायुतीत उमेदवारावरून ताणाताणी सुरच आहे.त्यामुळे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जावून गृहमंत्री अमीत शहा यांची भेट घेतली.भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अंतर्गत कलह निर्माण करून विद्यमान खासदार अशोक नेते यांना तिकीट देऊ नये; नवख्या माणसाला संधि घ्यावी; असे वरिष्ठांना सांगुन जनू दिशाभुल केल्याचे बोलल्या जात होते.अश्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २६ ला गडचिरोली येत असुन भाजपाच्या स्थानिक मुख्य कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचा संदेश देण्याकरीता येत असल्याचे कळते व याच दिवशी महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन भरतेवेळी त्यांची उपस्थिती राहणार आहे.त्यांचे गडचिरोली येणे भाजपाला बळ देण्यासाठी ठरणार कि राष्ट्रवादीला हे अजुनही गुलदस्त्यातच आहे.भाजपाला एकेक सिट चे महत्व आहे म्हणुन भाजपाचे नेते फुकुन पाणी पित आहेत. महायुतीत सदर जागा भाजपाकडे कायम राहील्यास खासदार अशोक नेते शिवाय पर्याय नाही कारण इंडिया आघाडीने डॉ.नामदेव किरसान च्या रुपाने तगडा उमेदवार दिलेलाआहे.याचेही भान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे.२०१९ च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार डॉ.गजभे यांनी १ लाख ११ हजार मते घेतली होती.हिच मते त्यावेळेस कांग्रेसला मिळाली असती तर कांग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडीस निवडुन आले असते यात शंकाच नव्हती.अश्या अनेक बाबीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस योग्य निर्णय घेणार असल्याचे भाजप गोठात बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!