उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली (कुरखेडा) :- कुरखेडा तालूक्यातील खरकाडा येथे रविवार १२ मार्च २०२३ रोजी नवविवाहिता हर्षदा महेश बन्सोड वय २३ वर्षे या महिलेचा सासूरवाडीच्या घरातच गळफास घेतलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली होती.या प्रकरणात मृतकाच्या वडीलांच्या तक्रारीवरून छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गून्हा दाखल करीत आज सोमवार १३ मार्च रोजी पती,सासू,,सासरा व दिराला अटक करण्यात आली आहे.
देसाईगंज तालुक्यातील बोळधा येथील हर्षदा गायकवाड हिचा विवाह मागील वर्षी १९ एप्रील २०२२ रोजी कुरखेडा तालुक्यातील खरकाडा येथील महेश बन्सोड याच्याशी झाला होता.घटनेच्या आदल्या दिवशी मृतकाने आपल्या वडीलांना फोन करीत घरी घेऊन जाण्याबाबद बोलली असल्याची अशी माहिती आहे. मात्र वडील तिच्या घरी पोहचण्यापूर्वीच तिच्या मृत्युची बातमी मीळाल्याने त्यांना धक्का बसला.यावेळी त्यांनी मूलीचे शवविच्छेदन कूरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यास विरोध केल्याने,तिचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले.
यानंतर रात्री शव घेत येथील पोलीस स्टेशनला पोहचले व आपल्या मूलीला शारिरीक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार कूरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली.गुन्हा दाखल करण्याच्या हमी नंतर शव घेत स्वगावी बोळधा येथे पोहचत रात्रीच तिथे मृतदेहावर अंतीम संस्कार करण्यात आला.कुरखेडा पोलीसांनी या प्रकरणात आरोपी पती महेश बाबूराव बन्सोड,सासरा बाबुराव ऋषी बन्सोड,सासू उषाबाई बाबूराव बन्सोड व दिर प्रणय बाबूराव बन्सोड या चौघा विरोधात भारतिय दंड संहिता १८६० चे कलम ३०४ ब,३०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करीत आज सकाळी चौघांना अटक केली.घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटिल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.