- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली आहेत.अशातच आज,शनिवारी १५ मार्चला
भामरागड उपविभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावरील जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोटके पुरुन ठेवलेली होती.विशेष अभियान पथक गस्त घालत असतांना जंगल परिसरातील झुडपांमध्ये एक बंदूक जवानांच्या निदर्शनास आली.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच बॉम्ब शोधक पथकास पाचारण करुन परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.शोध मोहिमेदरम्यान,झुडपांजवळील जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोलवर लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टिकची पिशवी आढळून आली. तपासणीअंती त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली असल्याने नक्षल्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे.

- Advertisement -