उद्रेक न्युज वृत्त :-अँड्रॉइड मोबाईलमुळे ऑनलाईनचे जाळे दूरवर पसरले गेले आहेत.त्यातच ऑनलाईन गेमिंग ॲप व त्याचा वापर करणारे अनेकजण आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसू लागल्याच्या घटना सर्वत्र उघडकीस आल्या आहेत.मात्र,सर्वांना आश्चर्यचकित तितकीच धक्कादायक घटना एका तरुण शेतकऱ्याच्या बाबतीत नुकतीच उघडकीस आली आहे.एका तरुण शेतकऱ्याने पाच दहा-लाख रुपये नाही तर ऑनलाईन चक्री गेमच्या नादात चक्क तब्बल ९० लाख रुपये नगदी,६ एकर जमीन आणि दोन तोळे सोने गमावले आहेत.एकवेळ तरी गेम जिंकेन,असे म्हणता-म्हणता सर्वकाही पणाला लावले.पण शेवटी तो हरला व संपत्तीला मुकला म्हणण्याची आता त्याच्यावर वेळ आली आहे.सदरची धक्कादायक घटना सोलापूर जिह्यातील कुईवाडीत उघडकीस आली आहे.भाबड्या आशेवर या तरुणाची सर्व संपत्ती हातातून गेली.बालाजी खरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.तो दोन वर्षांपासून मोबाईलवर जुगार खेळाचा,परंतु त्याला या गेममध्ये कधीच पैसे मिळाले नाहीत.फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.चक्री गेम हा एक ऑनलाइन गेम असून तो एकप्रकारचा जुगार आहे.या गेममध्ये झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवले जाते.हा गेम खेळणारे अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत.हा गेम खेळण्यासाठी बालाजीने एजंटला लाखो रुपये मोजले.एजंटला पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करायचा.पैसे पाठवल्यानंतर गेम खेळण्याची मुभा मिळायची.गेलेले पैसे एक दिवस परत येतील,या आशेवर बालाजी गेमध्ये इतका गुरफटला की,आपण काय करतोय? याचे सुद्धा भान त्याला नव्हते.भान आले तेव्हा त्याने सर्वकाही गमावून बसले होते.
धक्कादायक..! ऑनलाईन चक्री गेमच्या नादात पठ्ठ्याने गमावले ९० लाख रुपये नगदी,६ एकर जमीन आणि दोन तोळे सोने..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES