Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन सख्ख्या बहिणींसह एका महिलेचा नदीत बुडून मृत्यू..

दोन सख्ख्या बहिणींसह एका महिलेचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार १४ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या एका महिलेचाही मृत्यू झाला.समीक्षा उत्तम जाधव वय १६ वर्षे,उत्कर्षा उत्तम जाधव वय १८ वर्षे व सिंधू दत्ता जाधव वय ४५ वर्षे,अशी मृतकांची नावे असून तिघीही रा.मोहळा, ता.सोनपेठ,जि.परभणी येथील रहिवासी आहेत.या दुर्दैवी घटनेने मोहळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीक्षा व तिची बहीण उत्कर्षा आज रविवारच्या सकाळी साडेसातच्या सुमारास मोहळा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर आंघोळ करण्यासाठी  गेल्या होत्या.आंघोळ करत असतांनाच समीक्षा व उत्कर्षा या दोघी पाण्यात बुडू लागल्या.बुडत असतांना आरडा-ओरड केल्याने सिंधू जाधव यांनी नदीत उडी मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने त्या देखील पाण्यात बुडाल्या.या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिघींचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर,मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!