Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडादोन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर येथील घटना.. - सकाळच्या...

दोन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर येथील घटना.. – सकाळच्या घटनेने परिसरात हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर येथे गावानजीक असलेल्या शेतशिवारातील शेततळ्यात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, रविवार ६ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.विहान ज्ञानेश्वर मडावी वय १२ वर्षे रा.शिरपूर, ता.कुरखेडा तर ९ वर्षीय रुदय ज्ञानेश्वर मडावी रा.गडचिरोली असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मृतकांची नावे आहेत.विहान मडावी हा सातव्या वर्गात शिकत होता तर रुदय मडावी हा तिसऱ्या वर्गात होता.विहानचे वडील कुरखेडा तालुक्यात शिक्षक,तर रुदयचे वडील गडचिरोली पोलिस दलात कार्यरत  आहेत.दोघांच्याही मृत्यूने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.९ वर्षीय रुदयची मावशी शिरपूर येथे राहत असल्याने तो मावशीकडे आला होता.आज सकाळच्या सुमारास दोघेही मावस भावंडे खेळत असतांनाच गावानजीक असलेल्या एका नातलगाच्या शेतावर सायकलने गेले होते.शेतावर शेततळा दिसल्याने दोघांनी आंघोळ करण्याचा निर्णय घेतला.सायकल बाजूला ठेवत अंगावरील कपडे काढून पाण्यात उतरले.पावसाचे दिवस असल्याने सध्या स्थितीत शेततळे वा नाले-ओढे पाण्याने भरून आहेत.त्यामुळे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.शेतावरील काही नागरिकांना शेततळ्याच्या पाळीवर सायकल तसेच कपडे दिसून आल्याने सदरची घटना उघडकीस आली.घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!