Monday, July 13, 2026
Homeकुरखेडादोन तरुणांना 'आय लव्ह यू' म्हणणे पडले महागात..-मजनुगिरीने रवानगी झाली कारागृहात….-कुरखेडा तालुक्यातील...

दोन तरुणांना ‘आय लव्ह यू’ म्हणणे पडले महागात..-मजनुगिरीने रवानगी झाली कारागृहात….-कुरखेडा तालुक्यातील घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(गडचिरोली) :- नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा शाळेत जातांना पाठलाग करुन ‘आय लव्ह यू’ म्हणत छेड काढणाऱ्या दोन तरुणांना काल १२ सप्टेंबर २०२३ रोजी कुरखेडा पोलिसांनी जेरबंद केले.सदर घटना लज्जास्पद असल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

वैभव जांभुळकर वय २२ वर्षे व रेवननाथ दूधकुंवर वय २२वर्षे दोघेही कुरखेडा तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या रा.आंधळी नवरगाव येथील रहिवाशी आरोपींची नावे आहेत.पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार,पीडित मुलगी नववीत शिकते. शाळेत जातांना आरोपी तरुण तिचा दुचाकीवरुन पाठलाग करून ‘आम्ही प्रेम करतो; तू सुध्दा प्रेम कर’… असे म्हणत ते तिची छेड काढायचे.सुरवातीला मुलीने दुर्लक्ष केले; पण रोजच त्रास सुरु झाल्याने तिने मन घट्ट करुन कुटुंबाला आपबिती सांगितली व १२ सप्टेंबरला कुरखेडा ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्याद दिल्यानंतर विनयभंग व बाललैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंद झाल्यावर कुरखेडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिनेश गावंडे यांनी दोघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात झाली असल्याची  माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!