Thursday, October 15, 2026
Homeनागपूरदारूच्या नशेत मुलाने केली वडीलाची हत्या -नागपूर येथील घटना…..

दारूच्या नशेत मुलाने केली वडीलाची हत्या -नागपूर येथील घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- शक्तीमातानगर येथे एका मद्यधुंद मुलाने लोखंडी काठीने वार करून वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीतील शक्तीमातानगर येथे ही घटना घडली.

कृष्णराव रायपूरकर असे मृतकाचे नाव आहे.नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मुलगा अमित रायपूरकर याला अटक केली.अमित हा नेहमी दारु पिऊन पत्नी व वडिलांना शिवीगाळ करायचा.नेहमीप्रमाणे तो दारू पिऊन आला.त्याने पत्नी अर्चना यांना शिवीगाळ सुरू केली.यामुळे वडील कृष्णराव यांनी अमितला हटकले मात्र, संतप्त अमितने कृष्णराव यांच्या हातातील काठी हिसकावली व त्यांच्यावरच दोन वार केले.यातच कृष्णराव खाली कोसळले.हे पाहून अर्चना यांनी आरडाओरड केला. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने कृष्णराव यांना तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कृष्णराव यांना मृत घोषित केले.

नंदनवन पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर अमितला अटक केली.रवींद्र नाईकवाडे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!