उद्रेक न्युज वृत्त
भंडारा:- एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये रविवारी घडली.घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. क्रिष्णा रायभान धनजोडे वय २३ वर्षे राहणार – केशोरी तालुका – कामठी जि.नागपूर असे मृतकाचे नाव आहे.
क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते.२० ऑगस्ट रोजी हे दोघेही भेटण्याकरिता भंडारा येथे आले.शहरात फिरुन काही सामान खरेदी करुन त्यांनी जेवण केले.त्यानंतर शहरातील हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबले होते. दरम्यान, सदर तरुणी झोपेतून उठली असता तिने क्रिष्णाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला.परंतु,तो काहीच बोलत नाही.शिवाय त्याच्या शरीराची हालचालही होत नव्हती.त्यामुळे तिने लॉजमधील कर्मचाऱ्यांना बोलावून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून क्रिष्णाला मृत घोषित केले.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रहाटे करीत आहेत.