- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-छत्तीसगडच्या क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमित बघेल यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सिंधी समाजाचे कुलदैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल तसेच सिंधी समुदायाला केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ देसाईगंज संघर्ष समिती तथा सिंधी बांधवांच्या वतीने देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलिस प्रशासनास मंगळवारी निवेदन सादर करून सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी रायपूर येथील अमित बघेल यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अमित बघेल यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावरून सिंधी समुदायाला “पाकिस्तानी” असे संबोधले आणि
समुदायाचे दैवत श्री झुलेलाल यांच्याबद्दल अनादरपूर्ण टिप्पणी केली होती.यामुळे समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.अशा विधानांमुळे देशाचा सामाजिक सलोखा,धार्मिक एकता आणि शांततेला गंभीर धोका निर्माण होतो.शांतता,बंधुता आणि देशभक्तीवर विश्वास ठेवणारा सिंधी समुदाय कोणत्याही परिस्थितीत आपल्या धर्माचा आणि देवतेचा अनादर सहन करणार नाही; असे समाज बांधवांनी म्हटले आहे.घटनेमुळे छत्तीसगडसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सिंधी समुदायातून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.भविष्यात धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा कृती थांबवण्यासाठी अमित बघेल या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करतांना देसाईगंज संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत दयलानी,सिंधी समाजाचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण खत्री,पंकज आहुजा,मनोज धामेजा,दीपक नागदवे,पंकज नागदवे सह समाज बांधव उपस्थित होते.
- Advertisement -

