Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात आजपासून 'श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह'..

देसाईगंज शहरात आजपासून ‘श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य ‘श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह’ आज,गुरुवार १३ फेब्रुवारी पासून ते २० फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.त्यानिमित्ताने १३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत हरी भक्त परायण ज्ञानेश्कन्या वैशालीताई इंगळे, रा.अमरावती यांचा संगितमय भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसेच येत्या सोमवार १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शोभायात्रा व गुरुवार २० फेब्रुवारीला श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमीत्य भागवत कथा समारोप, किर्तन,गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यानच्या काळात दररोज हरीपाठ,भारूड, श्रीकुष्ण शोभायात्रा व हवनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,माजी खासदार अशोक नेते,माजी आमदार कृष्णा गजबे,माजी आमदार  आंनदराव गेडाम सह विविध मान्यवर उपस्थित असणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!