Saturday, December 13, 2025
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा मृत्यू; मुंडके धडावेगळे..

देसाईगंज येथे रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा मृत्यू; मुंडके धडावेगळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील चुना भट्टी जवळील रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या मालगाडीने धडक दिल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.नवलाजी ठवरे वय ५५ वर्षे,रा.हेटी बंगला,देसाईगंज,जि.गडचिरोली
असे रेल्वे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
माहितीनुसार,नवलाजी ठवरे हे देसाईगंज शहरातील एका चहाच्या दुकानात काम करीत होते.काम आटोपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे पायी-पायी आपल्या घराकडे निघाले होते.त्यांचे घर शहरातून जाणाऱ्या रेल्वेच्या पलीकडे असल्याने नवलाजी हे चुना भट्टी जवळील रेल्वे रूळ ओलांडत असतांना तितक्यातच गोंदियाकडून बल्लारशहाकडे जाणारी मालगाडी हॉर्न वाजवत आली.मात्र,नवलाजी यांना बरोबर ऐकू येत नसल्याने व वयोमानानुसार नीट चालता येत नसल्याने गाडीखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.रेल्वे रुळाचे चाक मानेवरून गेल्याने मुंडके धडावेगळे झाले व एक पाय तुटला.सदरची घटना काही नागरिकांनी प्रत्यक्ष डोळ्यादेखत बघितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटनेची माहिती होताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.याबाबत देसाईगंज पोलिसांना कळताच  घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात  पाठविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत वाळू साखरा व आंबेशिवणी डेपोतून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत वाळू/रेतीची ३८ प्रकरणे व...

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेकांना नायलॉन मांजाच्या धाग्यामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.नायलॉन मांजाची विक्री करण्यावर बंदी असतांनाही काहीजण पैश्याच्या लालसेने...

दोन श्रीमंत तरुणींशी प्रेमप्रकरण; दोघिंसाठी चोरायचा दुचाक्या.. – ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; २२ वर्षीय युवक ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-बीसीएचे शिक्षण घेणारा २२ वर्षीय युवक सोबतच एमपीएससीचे क्लासेस करतो.मध्यंतरी त्याची दोन श्रीमंत तरुणींशी मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू...

आता शेत रस्ते आणि वहिवाटीच्या वादात मिळणार मोफत पोलीस संरक्षण; विधेयक मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त :-शेत रस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे आणि त्यावर निर्णय घेणे शक्य होणार आहे.त्याचबरोबर,अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!