- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सी-६० जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती.मात्र,पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान पोलीस जवान महेश कवडू नागुलवार शहीद झाले होते.प्रकरणी घटनेतील मृत्यूच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याने,सदर प्रकरणात दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे.त्यामुळे घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी,एटापल्ली यांच्याकडे १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे,असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी केले आहे.
- Advertisement -

