Thursday, September 10, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज पोलिसांनी तालुक्यातील नागरिकांच्या हरविलेल्या तब्बल २५ मोबाईलचा शोध घेऊन आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी मूळ मालकांना परत केले.विशेष म्हणजे,मोबाईलमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती,बँकिंग व्यवहार,कागदपत्रे आणि महत्त्वाचा डेटा साठवलेला असतो.त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण  होते.अशावेळी देसाईगंज पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देसाईगंज तालुक्यातील बऱ्याच नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते.त्यानुसार,नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणांची गंभीर दखल घेत तांत्रिक तपासाला सुरुवात केली. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकांचा मागोवा घेत विविध ठिकाणी त्यांचे लोकेशन शोधण्यात आले.पोलिसांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा,तांत्रिक विश्लेषण आणि सायबर यंत्रणेच्या मदतीने हे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देतांना देसाईगंज पोलिसांनी सर्व
आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व २५ हरविलेले मोबाईल फोन मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.सदरची कार्यवाही कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गोडबोले,पोलीस पथक तथा अंमलदार शैलेश तोरपकवार यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!