Thursday, September 10, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषद निवडणूक; काँग्रेससाठी सकारात्मक संकेत.. - वनिता नाकतोडे यांच्या वाढत्या...

देसाईगंज नगर परिषद निवडणूक; काँग्रेससाठी सकारात्मक संकेत.. – वनिता नाकतोडे यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे राजकीय वातावरण तापले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वनिता नाकतोडे यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रचारमोहीमेचा वेग वाढला असून विविध प्रभागांमधून मिळणारा प्रतिसाद हा काँग्रेससाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.स्थानिक नागरिक, महिला बचतगट,युवक संघटना आणि व्यापारी वर्गांकडून नाकतोडे यांना भरघोस पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. “शहरातील मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छता व्यवस्था,पाणीपुरवठा आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण यावर आम्ही ठोस काम करू,” असे आश्वासन नाकतोडे यांनी नुकत्याच घेतलेल्या सभेत दिले.त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.काँग्रेसच्या गोटातही उमेदवाराच्या या वाढत्या ग्राफमुळे नवीन जोश निर्माण झाला आहे.पक्षातील कार्यकर्ते घराघरांमध्ये संपर्क मोहीम राबवत असून, नाकतोडे यांचे व्यक्तिमत्त्व,त्यांची कार्यशैली आणि स्थानिक प्रश्नांविषयीची जाणीव ही त्यांची मुख्य ताकद असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.दुसरीकडे,शहरातील सर्वसामान्य मतदारही बदल, विकास आणि स्वच्छ प्रशासनाच्या अपेक्षांवर भर देत आहेत. “प्रामाणिक नेतृत्व आणि व्यवहार्य विकास योजना असलेला उमेदवार आम्हाला हवा आहे,” असे अनेक मतदार सांगत आहेत. त्यामुळे वनिता नाकतोडे यांच्या नावाला मिळणारा वाढता प्रतिसाद हा आजच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे.निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरणे आणखी स्पष्ट होतील.मात्र, सध्याच्या वातावरणावर नजर टाकल्यास काँग्रेसच्या वनिता नाकतोडे या नगर परिषद निवडणुकीत महत्त्वाच्या दावेदार म्हणून पुढे येतांना दिसून येत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!