Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीअवैध सागवान वृक्षतोड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; गडचिरोली आम आदमी पक्षाकडून पोलखोल.. -...

अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; गडचिरोली आम आदमी पक्षाकडून पोलखोल.. – वडसा वन विभागाच्या पुराडा वन परिक्षेत्रातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वनांचे संवर्धन व संरक्षण करणे हे शासनाचे धोरण आहे.शासनाने यापूर्वी राज्यात दोन कोटी,चार कोटी,तेरा कोटी व ३३ कोटी वृक्ष लागवड योजना राबवून वृक्ष संवर्धनापासून ते संरक्षणावर कोट्यवधी रुपयांचे खर्च करण्यात आले.अश्यातच
काही अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून वनाचा ऱ्हास व शासनाचे नुकसान करून आरोपींना पाठीशी घालण्यात येत असल्याचा प्रकार वडसा वन विभागाच्या पुराडा वन परिक्षेत्रात उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,अवैध सागवान वृक्षतोडीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण,गडचिरोली आम आदमी पक्षाकडून सदर प्रकरणाची पोलखोल झाल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत गडचिरोली आम आदमी पार्टी अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्यवान रामटेके यांनी गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी गडचिरोली वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांना अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी रीतसर तक्रार दाखल करून पुराडा वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एच.चौधरी,वनक्षेत्र सहाय्यक बी.यु.तागडे व वनरक्षक टी.आर.भुरकुडे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून तिन्ही लोकसेवकांकडून अवैध सागवान वृक्षतोडीचा दंड वसूल करण्यात यावा,अशी मागणी केली आहे.
विभागीय वन कार्यालय वडसा(देसाईगंज)अंतर्गत येणाऱ्या पुराडा वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील रामगड उपक्षेत्राच्या रामगड नियतक्षेत्र कक्ष क्रमांक-२४१ मध्ये(पुराडा वनपरिक्षेत्र कार्यालयापासून कोरची मार्गे दोन ते अडीच किलोमिटर अंतरावर)मुख्य मार्गालगत अज्ञात इसमांनी तब्बल ९ सागवान वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड करून त्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे.सागवान वृक्षांची चोरी तर झाली,पण चोरट्यांनी वृक्षांच्या कटाईसाठी चक्क मशिनचा वापर
केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.अज्ञात चोरटे एवढ्यावरच थांबले नाही,तर पळवाटेसाठी मुख्य मार्गालगत मुरूम टाकून रस्ताही तयार केला.त्यातच,
अवैध सागवानाची वृक्षतोड ही जवळपास तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात केली असावी, असे प्रत्यक्ष थुट पाहणीवरून निदर्शनास येत आहे. सागवान सारखे मौल्यवान वृक्ष एकाच नियतक्षेत्राच्या एकाच कक्ष क्रमांकामधून आणि तेही एक-दोन नव्हे,तर तब्बल ९ वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड होऊन त्यांची चोरी करण्यात आली असतांनाही सदरची बाब पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एच.चौधरी,वनक्षेत्र सहाय्यक बी.यु.तागडे व वनरक्षक टी.आर.भुरकुडे यांच्या निदर्शनास न येणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. सदरची घटना ही कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आणि मुख्य मार्गालगतच्या क्षेत्रात असल्याने तिन्ही लोकसेवकांना याची कल्पना नसणे हे शक्य नाही. त्यामुळे झालेल्या अवैध सागवान वृक्षतोडीत तिन्ही लोकसेवकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची दाट शक्यता असून एवढी मोठी अवैध वृक्षतोड होत असतांना जंगलाच्या रक्षणकर्त्यांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.यामुळे शासनाच्या महसूल व वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.असे असतांनाही अवैध वृक्षतोडीवर पडदा टाकला जावा व वरिष्ठांच्या नजरेत आपण सुरक्षित राहावे,याकरीता अज्ञातांवर वन गुन्हे दाखल केले असावे व तेही दिलेल्या तक्रार अर्जानंतर तत्पूर्वी चोरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने घटनेबाबत वरिष्ठांना अलिप्त ठेवून माहिती दडवणे,लोकसेवकांची कर्तव्ये पार न पाडता कर्तव्यात कसूर केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एच.चौधरी,वनक्षेत्र सहाय्यक बी.यु.तागडे व वनरक्षक टी.आर.भुरकुडे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून तिन्ही लोकसेवकांकडून अवैध सागवान वृक्षतोडीचा दंड वसूल करण्यात यावा; संबंधितांवर तात्काळ कारवाई न झाल्यास याविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने उपोषणासह मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल,असे गडचिरोली आम आदमी पार्टी अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!