उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- शहराच्या नगरपरिषद क्षेत्रातील नगर भूमापन (सिटी सर्वे)कामासाठी नगर परिषदेने देसाईगंज भूमी अभिलेख विभागास ८०% रक्कम अदा करुनही अजूनपर्यंत पाच वर्षाचा कालावधी लोटूनही सिटी सर्वेचे काम पूर्ण न झाल्याने शासकिय योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या शहरातील लाभार्थ्यांना जागेचे पट्टे मिळाले नाहीत.त्यामुळे शहरातील जवळपास १,१२० नागरिक प्रधानमंत्री आवास योजना व इतर शासकिय योजनेच्या लाभापासून वंचित असल्याने नगर भुमापनाचे कामे योग्यरित्या शिघ्रतेने पुर्ण करुन देण्याकरीता भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज यांना त्वरीत आदेशीत करण्यात यावे; जेणेकरुन प्रधानमंत्री आवास योजना व इतर शासकिय योजनेचा लाभ गरजू व गोरगरीब नागरीकांना देता येणार; यासंदर्भात आज २५ मे २०२३ रोजी गडचिरोलीचे निवासी उजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी समाधान शेंडगे यांना देसाईगंज भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात मान्यवरांनी म्हटले आहे की,नगर परिषद देसाईगंज शहराच्या क्षेत्रातील नगर भूमापन (सिटी सर्वे) करण्यासंबंधाने नगर परिषदेच्या मान्यतेने नगर भुमापन (सिटी सर्वे) कामासाठी भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज यांनी रुपये ३ कोटी ४८ लाख रुपयांची मागणी केले होती. त्यानुसार नगर परिषद देसाईगंज कार्यालयाकडुन दिनांक- ४ फेब्रुवारी २०१८ रोजी रुपये २ कोटी ५० लाख रुपये दिनांक -६ जुलै २०१८ ला ३ लाख रुपये व दिनांक- १९ डिसेंबर २०१८ ला २५ लाख रुपये असे एकुण रुपये २ कोटी ७८ लाख रुपये नुसार ८० टक्के रक्कम प्रदान करण्यात आली आहे.मात्र आजमितीस पाच वर्षाचा कालावधी लोटूनही सिटी सर्वेचे काम पुर्ण झालेले नाही.त्यामुळे शासकिय योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना जागेचे पट्टे प्राप्त न झाल्यामूळे जवळपास १,१२० नागरिक प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकिय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत व यासंबंधी गरजू व गोरगरीब नागरिकांकडून वारंवार जनप्रतिनीधीस विचारणा करण्यात येत आहे.सिटी सर्व्हे कामाच्या प्रगतीबाबत भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज कार्यालयाकडुन योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. नगर भुमापनाचे कामासाठी नगर परिषद,देसाईगंज कार्यालयाकडुन एकुण रुपये २ कोटी ७८ लाख रुपये प्रदान करण्यात आले आहे.नगर भुमापनाचे कामे योग्यरित्या शिघ्रतेने पुर्ण करुन देण्याकरीता भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज यांना त्वरीत आदेशीत करावे.जेणेकरुन प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकिय योजनेचा लाभ गरजू नागरीकांना देता येणार.मात्र तसे न करता अजून पावेतो गोरगरीब जनता व सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे.करोडो रुपये सिटी सर्व्हे साठी प्रदान करण्यात आले असूनही अजूनपर्यंत सिटी सर्व्हे कां बरं केल्या जात नाही; याचे नवल वाटत आहे.सिटी सर्व्हे केले जात नसल्याने अनेकजण आवास योजनेच्या व इतर लाभापासून वंचित राहू लागले आहेत.त्यामुळे लवकरात लवकर सिटी सर्व्हे करण्यात यावा व सर्वसामान्य नागरिक व लाभार्थ्यास दिलासा मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मान्यवरांनी निवेदन सादर केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी माझी नगराध्यक्ष श्यामू उईके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचे सचिन वानखेडे,भाजपा तालुकाध्यक्ष,माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती नगर परिषद देसाईगंजचे सचिन खरकाटे,युवा मोर्चाचे चैतनदास विधाते,शहर महामंत्री अमीत फटीग युवा नेता व इतर पदाधिकारी उपस्थित होते.