Thursday, October 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध संस्थांच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली.तसेच सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.टी.गजभिये,डॉ.संजय एच.बाळबुद्धे,तसेच प्रा.अनिल बनपुरकर व प्रा. भागडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पाच विविध संस्थांना भेटी दिल्या.त्यामध्ये कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेला भेट देण्यात आली.यावेळी डॉ.सतीश गोगुलवार तसेच तुमडे यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर,ग्रामआरोग्य,घाटी या संस्थेला भेट देण्यात आली.यावेळी रुपचंद दखने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच देसाईगंज येथील ग्रामीण जिवोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांना भेट दिली. भेटीदरम्यान व्यवस्थापक सचिन उपरे,मेडे आणि गजभिये यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.तसेच आरोग्य प्रबोधिनी, आमगाव बुट्टी या संस्थेला भेट देण्यात आली.यावेळी आरती पुराम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक तसेच सामाजिक कार्यातील विविध पैलूंचे मार्गदर्शन केले. पाचव्या टप्प्यात समग्र शिक्षा,गट साधन केंद्र,देसाईगंज येथे विद्यार्थ्यांनी भेट दिली.यावेळी चांगदेव सोरते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.या सर्व संस्था भेटींमध्ये विद्यार्थ्यांना आयुष्यात काय केले पाहिजे,कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि समाजासाठी कार्य करतांना कोणती मूल्ये जपली पाहिजेत,याबाबत मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष संस्थांना भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि अनुभवात भर पडली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रियंका ठाकरे यांनी आभार प्रदर्शन करून संस्था भेटीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे,संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे,प्राध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या प्रत्यक्ष संस्था भेटी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!