उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यातील लेंढारी-जांभूळखेडा मार्गावर काल २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कुरखेडा मार्गे लेंढारी पासून तीन किलोमीटर अंतरावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बांबूचा ट्रक पलटी होऊन ट्रक चालकाच्या सतर्कतेने जीवितहानी टळली आहे.
बांबूने भरलेला ट्रक क्रमांक- एम एच ४९ ए टी ३४०७ धानोरा-मुरुमगाव,जलिया वरून नागपूर याठिकाणी जात असतांना लेंढारी पासून तीन किलोमीटर अंतरावर दुचाकीस्वाराने मुख्य डांबरी मार्गावर अचानकपणे दुचाकीचे ब्रेक मारल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने कट मारताच नाल्याच्या बाजूला झाडाला आपटून बांबू भलेला ट्रक पलटी झाला.ट्रकमधील चालक संजीवन सिंग(४०) यांनी ट्रक पलटी होताच समय सूचकता साधून उडी मारल्याने जीवितहानी टळली.