- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-देशाची राजधानी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडून आज,शनिवार ८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.अशातच भाजप,आप,काँग्रेस व इतर पक्षांच्या उमेदवारांची मतमोजणी प्रक्रिया सुरु असतांना तब्बल चार तासानंतर भाजप पक्षाने जोरदार मुसंडी मारत ७० जागांपैकी भाजप ४६ जागांवर आणि आम आदमी पक्ष (आप) २४ जागांवर आघाडीवर आहे.आपचे अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून आणि सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक हरले असून अतिशी,सत्येंद्र जैन,सोमनाथ भारती,सौरभ भारद्वाज,अमानतुल्ला खान आणि अवध ओझा हे पिछाडीवर आहेत.भाजप तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन करीत असल्याचे चित्र आहे.
- Advertisement -