Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीसात तालुक्यातील ७ लाख २२ हजार ४२३ पात्र नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्यांचे होणार...

सात तालुक्यातील ७ लाख २२ हजार ४२३ पात्र नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्यांचे होणार वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत कुरखेडा,देसाईगंज(वडसा),आरमोरी,गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या सात तालुक्यातील ७ लाख २२ हजार ४२३ पात्र नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या देण्यात येणार असून हत्तीरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी औषधोपचार घेऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके यांनी केले आहे.
हत्तीरोग संसर्ग रोखण्यासाठी डी.ई.सी.,अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टीन या तीन औषधांची मात्रा उंचीनुसार आणि वयोगटानुसार दिली जाणार आहे.२ वर्षांखालील बालके,गर्भवती महिला आणि गंभीर आजारग्रस्त रुग्ण वगळता सर्व नागरिकांनी हत्तीरोगविरोधी गोळ्या सेवन कराव्यात. हत्तीरोगविरोधी गोळ्या सुरक्षीत असून त्या सेवन करणे हा हत्तीरोगापासूच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे डॉ.हेमके यांनी सांगितले.
१० ते २० फेब्रुवारी दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन पात्र नागरिकांना या गोळ्या देणार असून  २१ व २२ फेब्रुवारी रोजी आरोग्य संस्था,बस स्थानके, शाळा,महाविद्यालय,आश्रमशाळा,ग्रामपंचायत आदी ठिकाणी ७२५ विशेष बूथ उभारून औषधोपचार केले जाणार आहे.मोहिमेदरम्यान वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी २४,२५,२७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मॉप-अप फेरी घेण्यात येणार आहे.या मोहिमेसाठी ३१०९ आरोग्य कर्मचारी आणि ३१३ पर्यवेक्षक कार्यरत असणार असून १५६५ पथकांद्वारे घरगुती भेटी दिल्या जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!