उद्रेक न्युज वृत्त
दिल्ली :- दिल्लीच्या महिला आयोगातून एक मोठी बातमी समोर आली आहे.महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर गंभीर आरोप करत दिल्लीचे राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी जारी केलेल्या आदेशात महिला आयोगात केवळ ४० पदे मंजूर असल्याचे म्हटले आहे.दिल्ली महिला आयोगाच्या कर्मचाऱ्यांना करारावर घेण्याचा अधिकार नाही.दिल्ली महिला आयोग विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी जारी केलेल्या या आदेशात असेही म्हटले आहे की, नवीन नियुक्त्यांपूर्वी अत्यावश्यक पदांचे कोणतेही मूल्यमापन करण्यात आले नव्हते.अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यासाठी परवानगीही घेण्यात आली नव्हती.दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी यावर्षी ५ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

