उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- शक्तीमातानगर येथे एका मद्यधुंद मुलाने लोखंडी काठीने वार करून वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीतील शक्तीमातानगर येथे ही घटना घडली.
कृष्णराव रायपूरकर असे मृतकाचे नाव आहे.नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मुलगा अमित रायपूरकर याला अटक केली.अमित हा नेहमी दारु पिऊन पत्नी व वडिलांना शिवीगाळ करायचा.नेहमीप्रमाणे तो दारू पिऊन आला.त्याने पत्नी अर्चना यांना शिवीगाळ सुरू केली.यामुळे वडील कृष्णराव यांनी अमितला हटकले मात्र, संतप्त अमितने कृष्णराव यांच्या हातातील काठी हिसकावली व त्यांच्यावरच दोन वार केले.यातच कृष्णराव खाली कोसळले.हे पाहून अर्चना यांनी आरडाओरड केला. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने कृष्णराव यांना तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कृष्णराव यांना मृत घोषित केले.
नंदनवन पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर अमितला अटक केली.रवींद्र नाईकवाडे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.