Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीदलित तरुणाच्या हत्या प्रकरणी विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा…

दलित तरुणाच्या हत्या प्रकरणी विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकस्वराज्य आंदोलन तर्फे RPI च्या विविध पक्ष व संघटनेच्या वतीने जिवती तालुक्यातील फाटागुड्डा येथील जिवन तोगरे व टेकामाडवा येथील संतोष शिंदे या दोन दलीत मित्रांना त्यांच्या गावातीलच संवर्ग जातीच्या मारेक-यांनी फोन वर बोलावून जंगलात व शिवारात एका महिन्याच्या अंतराने जिवंत ठार मारले.सदर प्रकरणाची त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार देऊनही टेकामाडवा व जिवती ठाणेदारांनी थातुरमातूर चौकशी करून मारेकऱ्यांना मोकाट सोडले.त्यामुळे तब्बल एक महिना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात आले परंतु तोगरे व शिंदे कुटुंबियांना न्याय मिळू शकला नाही.त्यामुळे आज दि.२४ ऑगष्टला जिवती तालुका तहसिल कार्यालयावर प्रचंड एल्गार मोर्चा रिपब्लिकन पार्टीचे चंद्रपूर जिल्ह्यध्यक्ष गोपाल रायपूरे,Brs चे समय्या पसुला’ ॲड.दत्तराज गायकवाड.RPI नेत्या प्रियाताई खांडे , रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, भागवत मोरे,प्रा.नक्कलवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तोगरे व शिंदे या दलीत तरुणाच्या मारेकऱ्याना त्वरीत पकडून मारेकर्‍याना फाशीची शिक्षा द्यावी. अट्राशिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवावा.या मागणीचे निवेदन जिवती तहसिलदार अविनाश शेंबटवाड, ठाणेदार रामटेके जिवती यांना देण्यात आले आहे.त्यानंतर तहसिल कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली.या सभेत गोपाल रायपूरे यांनी शासनाला कडक ईशारा दिला की, घटना हि सत्य असुन मारेकऱ्यांचा शोध न घेणारे ठाणेदार म्हैसेकर यांना सुद्धा आरोपी करावे.पोलीसांनी मारेकर्‍याच्या शोध घ्यावा; अन्यता पूढील आंदोलन तिव्र करण्याचा ईशारा सुद्धा शासनाला देवून महाराष्ट्र शासनाचा व पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.सभेस प्रा. मुनिश्चर बोरकर,प्रियाताई खांडे,प्रा.रामचंद्र भंडारे,ॲड. दत्तराज गायकवाड,सम्मय्या पसुला,प्रा.नल्लमवार, भागवत मोरे आदिनी घटनेचा निषेध नोंदविला.सदर प्रचंड एल्गार मोर्च्यात जिवती तालुक्यातील दलित बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!