Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीरोजगार हमी योजनेंतर्गत ३० लाखाच्यावर मनुष्य दिन रोजगार निर्मिती- रोजगार निर्मितीमुळे मजुरांच्या...

रोजगार हमी योजनेंतर्गत ३० लाखाच्यावर मनुष्य दिन रोजगार निर्मिती- रोजगार निर्मितीमुळे मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण- जिल्हाधिकारी संजय मिना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-  रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये २.१६ लक्ष नोंदणीकृत जॉबकार्डधारक कुटुंबातील १.८३ लक्ष नोंदणीकृत मजुरांना २६.४५ लक्ष मनुष्य दिवस उद्दिष्ट देण्यात आले होते.तथापी हे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले असून ३०.०३ लक्ष मनुष्य दिवस इतकी रोजगार निर्मिती झाली आहे.त्याची टक्केवारी ११९.०३ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली. विशेष म्हणजे या रोजगार निर्मितीमुळे मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण आले आहे.याकरीता मजूरांना ८३१०.२१ लक्ष रुपये इतके मजुरीचे वाटप बँक व पोष्ट खात्यातून करण्यात आले आहे.मनुष्य निर्मिती दिवसापैकी ३८.७३ टक्के हे अनुसूचित जमाती, १०.५१ टक्के हे अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मिती झाली आहे.एकूण मनुष्यदिन निर्मितीपैकी महिलांकरीता ४८.९५ टक्के मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. एकूण झालेल्या कामांपैकी ६४.०१ टक्के इतका खर्च कृषी व कृषी आधारीत कामावर करण्यात आला आहे.या वर्षीच्या अतिवृष्टीचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत मग्रारोहयोवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहीत धरून त्यानुसार वार्षिक नियोजन करण्यात आले आहे.अकुशल कामांना हातांना कामे देण्याबरोबरच कायमस्वरुपी मत्ता निर्मितीचे देखील लक्ष ठेवण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ अमृत सरोवर निर्मितीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिले होते. गडचिरोली जिल्ह्याने ११० अमृत सरोवर पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण केले आहे.पूर्ण झालेल्या अमृत सरोवर किनाऱ्यावर १ मे २०२३ व १५ ऑगस्ट २०२३ रोजी विविध कार्यक्रम राबविण्यासह ध्वजारोहण करण्यात आले.२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा अमृत सरोवरांवर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.जिल्ह्यातील प्रत्येक अमृत सरोवर टिकाऊ व दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे मानाचे प्रतिक मानल्या जाईल.जिल्ह्यात “मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमाअंतर्गत ४५८ ग्रामपंचायतमध्ये ७५ देशी झाडांची लागवड करण्यासह शिलाफलक तयार करून पंचप्रण शपथ घेण्यात आली.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!